Anubombchi Kahani

Shop

Anubombchi Kahani

275.00

द्वितीय महायुद्धाच्या काळ्याकुट्ट कालखंडालाही एक सोनेरी झालर होती. अत्यंत विपरीत परिस्थितीवर मात करून अफाट कर्तृत्व गाजवणारी माणसे याच काळात मोठ्या संख्येने निर्माण झाली. छोट्या छोट्या व्यक्तींनी महत पराक्रम करून इतिहासात आपले नाव अजरामर केले. अतिशय क्रूर शत्रूशी मुकाबला करण्यासाठी कित्येक युवकयुवतींनी हसत हसत बलिदान केले. माणसाची सहनशक्ती, हिंमत, निर्भयता, सोशिकता, पराक्रम या सर्व सद्गुणांची कसोटी द्वितीय महायुद्धात कसाला लागली.

Placeholder

275.00

Add to cart
Buy Now
Compare

द्वितीय महायुद्धाच्या काळ्याकुट्ट कालखंडालाही एक सोनेरी झालर होती. अत्यंत विपरीत परिस्थितीवर मात करून अफाट कर्तृत्व गाजवणारी माणसे याच काळात मोठ्या संख्येने निर्माण झाली. छोट्या छोट्या व्यक्तींनी महत पराक्रम करून इतिहासात आपले नाव अजरामर केले. अतिशय क्रूर शत्रूशी मुकाबला करण्यासाठी कित्येक युवकयुवतींनी हसत हसत बलिदान केले. माणसाची सहनशक्ती, हिंमत, निर्भयता, सोशिकता, पराक्रम या सर्व सद्गुणांची कसोटी द्वितीय महायुद्धात कसाला लागली. ‘कालगतीहुनी बलवत्तर ही पौरुषशाली मने’ ही काव्यपंक्तीच जणू त्या काळात साकार झाली. तुरुंगाच्या उंच उंच भिंती, पोलादी दरवाजे, अंधार कोठड्या आणि साखळदंड या साऱ्या गोष्टी मानवी मनाच्या निर्धारासमोर हतबल ठरतात, हे द्वितीय महायुद्धाने पुन्हा एकदा सिद्ध केले.
द्वितीय महायुद्धाच्या महाभीषण कालखंडातच अणुबाँब नावाचे एक अमोघ अस्त्र सिद्ध झाले. अशा प्रकारचे अस्त्र केवळ परमेश्वराच्या हातातच शोभून दिसले असते. मानवजातीचा इतिहास बदलणाऱ्या या नूतन आग्नेयास्त्राच्या निर्मितीची कहाणी हे असेच एक रोमहर्षक पर्व आहे. हिटलर नावाच्या क्रूरकर्म्यावर मात करण्यासाठी वैज्ञानिकांनी केलेल्या अखंड धडपडीची ती एक यशोगाथा आहे. सहा वर्षे रेंगाळलेले महायुद्ध अणुबाँबच्या दोन सणसणीत तडाख्यांनी तडकाफडकी कसे संपले, याची कथा मोठी विलक्षण आहे. ही चित्तवेधक कहाणी हाच ‘अणुबाँबची कहाणी’ या पुस्तकाचा विषय आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Anubombchi Kahani”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X