Description
या कहाणीचा नायक आहे विनायक महादेव कुलकर्णी. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला. परिस्थितीशी झगडत शिकला सवरलेला. मोठ्या उमेदीन तो बांधकामव्यवसायात शिरला. मात्र खाजगीकरण, उदारीकरण अन जागतिकीकरण यांचे सुसाट वारे वाहू लागले. बघता बघता वादळाच रूप घेतलेल्या या परिस्थितीन विनायकच्या आयुष्यातही उलथापालथ घडवली. चांगल्या वाईटाचा विचार न करता भौतिक सुखांमागे धावणारी आसक्ती, त्यातून मानसिक अस्वस्थता, भ्रष्ट आचरण,, गुन्हेगारी वृत्ती, नैतिकतेचा र्हास या चक्रव्यूहात सापडून विनायची होलपट झाली.
Reviews
There are no reviews yet.