Description
स्वामीजींचे पाककौशल्य, त्यांच्या खानपानातल्या आवडीनिवडी, त्यांनी परदेशांत वेदांताप्रमाणेच बिर्याणीचाही केलेला प्रसार, त्यांचे चहावरचे कमालीचे प्रेम, त्यांना जडलेले त-हेत-हेचे आजार आणि त्यांच्या आरोग्यामध्ये सतत होत राहिलेले चढउतार, पशुपक्ष्यांबद्दलचे त्यांचे प्रेम, आपला अंतकाळ जवळ आल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी केलेली कौटुंबिक निरवानिरव, त्यांनी सतत जवळ बाळगलेली गंगाजलाची कुपी… आणि सर्वांनाच चटका लावून गेलेले त्यांचे महानिर्वाण… हे आणि असे असंख्य अज्ञात पैलू उजेडात यावेत, या हेतूने ‘शंकर’ या टोपणनावाने प्रसिध्द असणा-या बंगाली साहित्यिकांनी विवेकानंदविषयक देशीविदेशी साहित्याचा धांडोळा घेऊन तयार केलेले हे पुस्तक बंगालमध्ये विक्रमी लोकप्रियता कमावणारे ठरले. आता ते थेट बंगालीतून मराठीत अवतरले आ स्वामी विवेकानंदांच्या अज्ञात पैलूंवर या पुस्तकाने प्रकाश टाकला आहे. लेखक शंकर यांनी लिहिलेल्या मूळ बंगाली पुस्तकाचा डॉ. मृणालिनी गडकरी यांनी केलेला अनुवाद आहे. विवेकानंदांचे पाककौशल्य, त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, त्यांनी परदेशात वेदांप्रमानेच बिर्याणीचा केलेला प्रसार, त्यांचे चहावारचे प्रेम, पशुपक्ष्यांविषयीचे प्रेम, त्यांना झालेले आजार आणि प्रकृतीच्या वारंवार होणाऱ्या तक्रारी, अंतकाळ जवळ आल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी केलेली कौटुंबिक निरवानिरव, स्वतःजवळ बाळगलेली गंगाजलाची कुपी आणि त्यांचे महानिर्वाण यासंबंधीची अपरिचित माहिती वाचकांसमोर येते. विवेकानंदांना त्यांच्या आईसाठी भाऊबंदकीत भाग घ्यावा लागला होता. कोर्टातही जावं लागलं होत, ही वेगळी माहिती समोर येते. परदेशातील दौऱ्यांमधील अनोळखी माहितीही समजते. पुस्तकात काही दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे.
Reviews
There are no reviews yet.