Description
रानकवी म्हणून महाराष्ट्राला सुपरिचीत असणार्या ना.धों.महानोर यांचं ललित लेखनही तितकचं सकस आणि मनाला रुंजी घालणारं आहे.ना. धो. महानोर म्हटले, की जैत रे जैत चित्रपट आठवतोचं. त्यातील गाण्यातील बोल जितके अवीट आहेत, तितक्याच त्यांच्या गावातील पळसखेड्यातील आठवणीही ताज्यातवान्या वाटतात. गावातील समृद्ध जीवनाचे अनुभव त्यांनी ‘आठवणींचा झोका’ म्हणून शब्दबद्ध केले आहेत.पळसखेड्याचे रोजचे जगणे कसे होते, हे सांगताना गावातील सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक वातावरण त्यांनी उभे केले आहे. लोकसंगीतातूनचं ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ या गीत रचनेचे मूळ कशात आहे, यात समजते. जात्यावर म्हटल्या जाणाऱ्या ओव्यांमधील काव्याचे प्रकार उलगडून दाखविले आहेत.१९४८ मध्ये निजामी राजवटीचा अस्त होण्यापूर्वी रझाकारांनी लयलूट करून पळसखेद उध्वस्त केले. त्यामुळे सुरक्षेसाठी त्यांना मामाच्या गावाला पाठविण्यात आले. त्या वेळी त्यांना भेटलेली माणसे, आईच्या आठवणींचा गहिवर, शेंदुर्णीला मिळालेले शैक्षणिक संस्कार, रोहिणीनंतरच्या पावसाच्या नक्षत्रांमधील शेतकऱ्यांची धांदल,पु. ल. देशपांडे, कविवर्य बा. भ. वारेकर यांच्यासमवेत फळबागेत अनुभवलेले निसर्गाचे विलोभनीय रूप, बंजारा समाजाचे जीवन, घरी विसावणारी मुक्ताबाईंची दिंडी, अजिंठा डोंगराजवळील फर्दापूरच्या विश्रामगृहात अनुभवलेला दिग्गज कलावंतांचा सहवास, या पर्वतराजीतील रुद्रेश्वाराचे मंदिर असा हा आठवणींचा खजिना यात आहे.
Reviews
There are no reviews yet.