Description
पत्रकारितेत स्वतःची वाट चोखाळणार्या तरुणांच्या एकत्रित धडपडीतून उभ्या राहिलेल्या एका यशस्वी प्रयोगाची ही गोष्ट.पंचवीस वर्षांच्या पहिल्या टप्प्यातला खटाटोप उलगडून दाखवणारी.इंटरनेट, गुगल आदी माध्यमांची सोय नसण्याच्या काळात व पत्रकारितेत नव्याने पाऊल ठेवलेल्या पाच होतकरू मित्रांनी पत्रकारिता करायची पण स्वतंत्रपणे, असा विचार करून ‘युनिक फिचर’ या माध्यम संस्थेची स्थापना १९९० मध्ये केली. पुण्या-मुंबईच्या दैनिकांव्यतिरिक्त महाराष्ट्रातील दैनिकांची माहिती घेऊन, भेट देऊन त्यांना या फिचर एजन्सीची संकल्पना सांगून लेख प्रसिद्द करण्याची परवानगी घेऊन युनिकचे काम सुरु झाले.वैशिट्यपूर्ण कामामुळे अल्पावधीत युनिकला मान्यता मिळू लागली. विजय तेंडूलकर, रत्नाकर मतकरी, दया पवार, लक्ष्मण माने, यू. म. पठाण, कुमार केतकर, निळू दामले, अशोक शहाणे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांसारख्यांचे लेखन वेगवेगळ्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येऊ लागले. अनेक शोधलेखांचे लेखन युनिकने केले.याचा आढावा सुहास कुलकर्णी यांनी युनिक फिचर्सच्या पत्रकारी प्रयोगाची गोष्ट असलेल्या ‘आमची पत्रकारी खटाटोप’ या पुस्तकातून संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने घेतला आहे. विविध दिवाळी अंकांमधील युनिकचा सहभाग, दैनिकांबरोबर केलेले प्रकल्प, टीव्हीवरील मुशाफिरी, ‘अनुभव’ मासिकाची सुरुवात, समकालीनप्रकाशन असे युनिकचे बदलते स्वरूप हे सर्व यात आले आहेत.
Reviews
There are no reviews yet.