Description
सुरस आणि चमत्कारिक गोष्टी ऐकायला कुणाला आवडत नाहीत ! उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी दिवसा, तर कधी रात्री आजी आपल्या नातवंडांना गोष्टी सांगायला घेऊन बसते. ही नातवंड आपल्या आजीकडे खेड्यात सुट्टी घालवायला आलेली असतात. आजीने आपल्या गोष्टींची पोतडी उघडल्यावर सगळे जण तिच्याभोवती गोळा होतात. आजीच्या पोतडीतून राजाच्या आणि भामट्यांच्या, माकडांच्या आणि उंदरांच्या, अस्वलाच्या आणि देवाच्या अशा असंख्य गोष्टी निघतात. त्यात एक अस्वल खुप वाईट खीर खाऊन चिडतं, तर कधी गोष्टीतला माणूस इतका आळशी असतो की, समोर आग लागलेली दिसत असूनसुद्धा ती विझवण्याचे कष्ट घेत नाही आणि अखेर स्वतःची दाढी पेटल्यावर घाबरतो ! कधी एका राजकन्येचं कांद्यात रुपांतर होतं, तर कधी एक राणी रेशमी वस्त्र बनवण्याच्या कलेचा शोध लावते.
प्राण्यांचे आणि माणसांचे विविध नमुने या गोष्टींमधून आपल्याला भेटतात. आजीच्या या गोष्टी मनोरंजक तर आहेतच; पण त्या मुलांना खुप काही ज्ञान देऊन जातात.
चला तर, या गोष्टींचा आनंद लुटू या !
Reviews
There are no reviews yet.