कथा आणि लौकिक जीवनातील या आठवणी आहेत. कल्पित आणि लौकिकांचे अनेक पदर इथे एकमेकात गुंतलेले दिसतात. त्यामुळेच ते वाचकास अस्वस्थ आणि अंतर्मुख करतात. काय टाकावं आणि काय टिकवावं याचा विवेक असणं जगण्याचं वैशिष्ट्य असतं. हे वैशिष्ट्य जोपासण्याचं काम चांगलं साहित्य करत असतं. या संग्रहातील कथा-आठवणी हेच संदेशन देणाऱ्या आहेत. नियतीनं मूळ व्यक्तीची होणारी होरपळ हे या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. आपले सुख लाथाडून बाहेरच्या पीडितांसाठी स्वेच्छेने दुःख भोगण्यास तयार असणे हा करुणेचा पदरही इथं दिसू लागतो. हीच खरी मानवी संवेदना लेखनाच्या मुळाशी दिसून येते.
Reviews
There are no reviews yet.