हृदयाची योग्य ती काळजी घेण्यासाठी सर्वप्रथम त्याचे कार्य कसं चालतं याची माहिती असणं आवश्यक आहे. तसेच हृदयाला पोषक अशा अन्नघटकांचं नेमकं कार्य कोणतं, हृदयरोगाची कारणं व लक्षणं कोणती हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे.
हृदयाचे संरक्षण करण्यासाठी अन्न हे आघाडीच्या सैनिकासारखे काम करते. आहारावर लक्ष ठेवून तुम्ही हृदयरोग किंवा ‘हार्ट-अॅटॅक’ची शक्यता खूपच कमी करू शकता.
आहाराची योग्य निवड ही फक्त हृदयरोग्यांचीच गरज नसून सर्वांचीच आहे. पण हृदयरोग्यांच्या दृष्टीने आहाराचं महत्त्व जास्त आहे.
सुदैवाने भारतीय पाकशास्त्रामध्ये शाकाहारी व मांसाहारी व्यंजनांचे प्रकार व वैविध्य खूप आहे. रायते, चटणी, सॉस, पोळी, भाकरी, पुलाव, खिचडी, सुकामेवा, कमी गोड असलेले पदार्थ, पौष्टिक नाष्टा यांचेही अनेक प्रकार आहेत. तेला-तुपाचा वापर कमी करूनही चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थ बनविता येतात.
या पुस्तकात हृदयाचे कार्य, त्याचे आरोग्य व त्यासाठी योग्य आहार याविषयी संपूर्ण माहिती देऊन लो-कॅलरी, लो-कोलेस्टेरॉल, लो-फॅट असलेल्या, करायला सोप्या परंतु हृदयरोग्यांना अतिशय पोषक तरीही चविष्ट अशा १२५ पाककृतीही दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.