21 मे, 1991: राजीव गांधी श्रीपेरुंबुदूर येथील
निवडणूक प्रचारसभेस गेले- ते तिथून परतलेच नाहीत…
पत्रकार नीना गोपाल त्या प्रचारसभेला जातानाच्या वाटेवर मोटारीत राजीवजींची मुलाखत घेत होत्या. आत्मघातकी बॉम्बर धनूनं स्वत:ला बॉम्बस्फोटात उडवून घेतलं आणि राजीवजींची आणि त्यांच्यासह तिथे उभ्या अनेक निरपराधांची हत्या घडवून आणली, तेव्हा त्या स्वत: राजीवजींपासून अवघ्या काही फुटांवर उभ्या होत्या. लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन यानं राजीव-हत्येचा जो कट शिजवला त्याचा मागोवा घेताना नीना गोपालना तपशीलवार घेतलेल्या मुलाखती, अभ्यास आणि पत्रकार म्हणून स्वत:चा विस्तृत अनुभव यांच्या शिदोरीचा खूप उपयोग झाला. राजीव गांधी ज्या श्रीपेरुंबुदुर येथे अविचलितपणे मृत्यूला सामोरे गेले,
त्या मे महिन्यातील शोकात्म संध्याकाळपर्यंत एकेक पाऊल उचलत
त्या आपल्याला या पुस्तकाद्वारे घेऊन जातात…
नीना गोपाल यांनी राजीव गांधींच्या हत्येच्या कटाबद्दल सांगताना प्रत्यक्ष वार्तांकन, उत्कंठापूर्ण शैली आणि बहु-अभ्यासित पार्श्वभूमीचा वापर केला आहे…
– लिव्हमिंट
हे पुस्तक प्रचंड संशोधनावर आधारलेले आहे…
– फ्री प्रेस जर्नल
नीना गोपाल यांनी ह्या कहाणीच्या सगळ्या बाजू आपल्यासमोर मांडल्या आहेत.
– गल्फ न्यूज
Reviews
There are no reviews yet.