सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (Sawarkaranchya samajkrantiche antrang)

सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (Sawarkaranchya samajkrantiche antrang)

सावरकरांच्या त्या समाजक्रांतीच्या यशाचे रहस्य कशात होते, याची साधार उकल करून दाखवणारा हा विचारप्रवर्तक ग्रंथ सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुद्दाम वाचला पाहिजे, अभ्यासला पाहिजे. ‘

Original price was: ₹275.00.Current price is: ₹250.00.

Availability:Out of stock

‘आपल्या सामाजिक विचाराला आणि आचाराला आपल्या समग्र कर्तृत्वाचा गाभा मानणारे सावरकर म्हणजे काही शास्त्राधार पाहून- दाखवून समाज बदलायला निघालेले समाजसुधारक नव्हते तर `धर्मग्रंथावर समाजसंस्था उभी करण्याचे दिवस संपले, अशी घोषणा करणारे बुद्धिप्रामाण्यवादी कर्ते विचारवंत होते. हिंदू समाजाला जखडून टाकणा-या `सप्तबंदीच्या बेड्या आपल्या घणाघाती युक्तिवादाने खळाखळा तोडून टाकणारे ते क्रांतिकारक होते. त्यांनी रत्नागिरीत जसे पतितपावन मंदिर उभारले, तशी पूर्वास्पृश्यांना अनेक जुनी मंदिरे खुली करून देण्यासाठी यशस्वी आंदोलनेसुद्धा केली. सावरकरांचे क्रांतिकारक समाजकार्य पाहून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, भाई माधवराव बागल, `सत्यवादीकार बाळासाहेब पाटील प्रभृती ब्राह्मणेतर सुधारकही प्रभावित झाले होते. `ते क्रांतिकार्य पूर्ण करण्यासाठी आपले उरलेले आयुष्य परमेश्वराने सावरकरांना द्यावे, अशी प्रार्थना महर्षी शिंदे यांनी केली होती. सावरकरांच्या त्या समाजक्रांतीच्या यशाचे रहस्य कशात होते, याची साधार उकल करून दाखवणारा हा विचारप्रवर्तक ग्रंथ सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुद्दाम वाचला पाहिजे, अभ्यासला पाहिजे. ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (Sawarkaranchya samajkrantiche antrang)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0