अभियंता दिन ज्यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो, जे एक अभियंता, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, उत्कृष्ट प्रशासक, लेखक, द्रष्टा आणि सामान्य जनतेचा हितकर्ता म्हणून ओळखले जातात. भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या’ या हिमालयाएवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ही एक तोंडओळख!
भारताच्या इतिहासात अशी अनेक व्यक्तिमत्त्व होऊन गेली, ज्यांनी आपल्या कतृत्वाने देशाच्या जोरावर विविध क्षेत्रात यशाचे नवे मानदंड तयार केले. सर विश्वेश्वरय्या त्यापैकीच एक!
102 वर्षांचे आयुष्यमान लाभलेल्या या अभियंत्याने खरोखरीच आपल्या कुशल हातांनी देशाची व जगाची जडणघडण करत आपल्या जीवनाचं सार्थक केलं.
हे छोटेखानी पुस्तक तुम्हाला अशी प्रेरणा देईल की, या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण परिचय करून घेतलाच पाहिजे, हा तर श्रीगणेशा आहे.
तस्मात् म्हणा आणि करा सुरुवात!
Reviews
There are no reviews yet.