सर्वोच्च यशाचे नियम (Sarvochcha Yashache Niyam)

सर्वोच्च यशाचे नियम (Sarvochcha Yashache Niyam)

तुमच्या जीवनाला चित्त्याची झेप घ्यायला लावणारी शक्ती देणाऱ्या पुस्तकाच्या शोधात आहात?
मग तुमचा शोध थांबवा.
‘सर्वोच्च यशाचे नियम’ हे पुस्तक आपल्या सगळ्यांमधील आश्चर्यांना हलवून जागे करू शकणाऱ्या गजराची घंटा वाजवत आले आहे.
ते जितके मुद्देसूद आहे तितकेच काळजाला भिडणारे आहे.

Original price was: ₹395.00.Current price is: ₹315.00.

Original price was: ₹395.00.Current price is: ₹315.00.

Add to cart
Buy Now

Book Author (s):

Brian Tracy

तुमच्या जीवनाला चित्त्याची झेप घ्यायला लावणारी शक्ती देणाऱ्या पुस्तकाच्या शोधात आहात?
मग तुमचा शोध थांबवा.
‘सर्वोच्च यशाचे नियम’ हे पुस्तक आपल्या सगळ्यांमधील आश्चर्यांना हलवून जागे करू शकणाऱ्या गजराची घंटा वाजवत आले आहे.
ते जितके मुद्देसूद आहे तितकेच काळजाला भिडणारे आहे.
– हार्वे मॅके
खासगी आणि जाहीर चर्चासत्रांमधून दरवर्षी लाखो लोकांना यश आणि व्यक्तिगत सिद्धिप्राप्तीविषयी भाषण देणारे ब्रायन ट्रेसी हे जगातील अग्रगण्य लेखकांपैकी एक आहेत.
‘सर्वोच्च यशाचे नियम’ या पुस्तकात ते एक अत्यंत सशक्त आणि उपयुक्त सिद्ध झालेली पद्धती देत आहेत;
जी त्यांच्या पंचवीस वर्षांच्या संशोधनावर व सरावावर आधारित आहे.
तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उत्तम परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा त्वरित अंमल करू शकता.
जगात सगळीकडे, सर्व क्षेत्रात उच्चसिद्धी प्राप्त करणाऱ्या व्यक्तींनी वापरलेल्या कल्पना, संकल्पना आणि पद्धती तुम्ही या पुस्तकातून शिकता.
व्यक्तिगत महानतेच्या सर्वोच्च शिखरावर नेणाऱ्या तुमच्या सुप्त गुणांना जागे कसे करावे हे समजून घेता.
हाती घेतलेल्या प्रत्येक बाबतीत तुम्ही त्वरित अधिक सकारात्मक, चिकाटीपूर्ण आणि लक्ष्यकेंद्री बनता.
हे पुस्तक ज्या चर्चासत्र कार्यक्रमांवर आधारित आहे त्या कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या दशलक्ष लोकांपैकी असंख्य लोकांनी त्यांचे उत्पन्न अविश्वसनीय प्रमाणात वाढवले आहे आणि त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणा केली आहे.
या पुस्तकात देण्यात आलेल्या यश आणि सिद्धिप्राप्तीच्या टप्पेवार आराखड्यात मानसशास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास आणि जीवनविषयक दर्शनशास्त्रात उपयुक्त सिद्ध झालेल्या सिद्धांतांचा समावेश करण्यात आला आहे. या कल्पना व सिद्धांत एका वेगवान आणि माहितीप्रचुर टप्प्यांच्या शंखलेत अशा रीतीने विणले गेले आहेत जे तम्हाला इतके अमाप यश मिळवून देतील, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल.
ते तुमची आत्मप्रतिष्ठा उंचावतील. तुमच्या कार्यप्रदर्शनात सुधारणा करतील आणि तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील प्रत्येक घटक ताब्यात घ्यायला लावतील.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सर्वोच्च यशाचे नियम (Sarvochcha Yashache Niyam)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0