हे आत्मकथन आहे जगातल्या अनेक गोष्टींना एखाद्या उत्साही मुलीच्या अवखळ कुतुहलाने सामोरे जाणाऱ्या एका प्रतिभावंत मनस्विनीचे! आकाशवाणीपासून दूरचित्रवाणीपर्यंत बालनाटय अन् प्रायोगिक रंगभूमीपासून जास्वंदी, सख्खे शेजारी अशा गाजलेल्या नाटकांपर्यंत अनोख्या डॉक्युमेंट्रींपासून चष्मेबद्दूर, कथा, दिशा, स्पर्श, साज अशा अनवट चित्रपटांपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये स्वत:ची अमिट छाप उमटवणारी ही बहुआयामी प्रतिभावान कलाकार : सई परांजपे मिस्कील आणि मनस्वी प्रेमळ आणि फटकळ नर्मविनोदी आणि स्पष्टवक्ती. आग्रही आणि पारदर्शी. सईंच्या व्यक्तिमत्त्वाचे असे विविध पैलू उलगडणारे आत्मकथन सय.
Reviews
There are no reviews yet.