आपला मित्र समशेर कुलुपघरे उर्फ ‘शेरलॉक होम्स’ त्याच्या मित्राच्या निलेशच्या घरी सुट्टीवर राहायला आलेला आहे. आणि तो एकटाच नाहीये,
तर सगळी टीमच आहे त्याच्याबरोबर. सुट्टीमध्ये धमाल करायचा त्यांचा विचार. पण निलेशच्या राहत्या ऐतिहासिक वाड्यात अप्पासाहेबांना चक्क भूत दिसलेलं आहे.
एक नाही, दोन नाही तर तीन-तीन भुतं दिसलेली आहेत. एक हवेत तरंगतं, एक उंचाड खिडकीतून दिसतं, तर तिसरं मेणबत्तीवालं भूत आहे.
भुतं नसतात असं समशेरचं म्हणणं. पण ही भुतं पाहिल्याचं सांगणारे साक्षीदार तर पुष्कळ आहे. समशेर नाईलाजाने या तपासकथेत ओढला गेलाय.
आणि मग सुरू होतो पहिला रोमांचकारी तपास. आणि समशेरचा दुसरा असाच तपास असतो मोतीच्या शोधाचा.
समशेरचा मित्र गंपूच्या कुत्र्याचं नाव मोती! हा मोती! हा मोती सर्वांचा लाडका! आणि हा मोती नेमका नाहीसा झालाय. कुणीतरी त्याला पळवून नेलंय!
गंपूने तर मोती सापडेपर्यंत अन्न-पाणी न घेण्याची प्रतिज्ञाच केलीय. मग सुरू होतो समशेरचा आणि मित्रमंडळींचा तपास. तिसर्या प्रकरणात
एक दुर्मिळ असं लपवून ठेवलेलं पोस्टाचं तिकिट त्याला शोधून काढायचं आहे. होतो का यशस्वी तो या प्रकरणांमध्ये?
जाणून घेण्यासाठी तुम्हाला वाचाव्या लागतील समशेरच्या बुद्धिचातुर्यसाहसकथा!
Reviews
There are no reviews yet.