जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जेव्हा सत्य नडेला याची नियुक्ती झाली तेव्हा एकीकडे भारतीयांच्या माना ताठ झाल्या, तर दुसरीकडे तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अभ्यासकांच्या मनात हा मुरब्बी तंत्रज्ञ मायक्रोसॉफ्टला कोणती नवी दिशा देणार याबद्दल प्रचंड औत्सुक्य निर्माण झालं होतं. कारण तेव्हा गुगल आणि अॅपल प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपला मोर्चा मोबाइल फोन वा टॅब यांकडे वळवला होता.
तर, मायक्रोसॉफ्टने या क्षेत्रात अग्रणी होण्याच्या संधी गमावल्या होत्या. नडेलाने मात्र सूत्रं स्वीकारल्यावर लगेच नव्या बदलांच्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली.
या पुस्तकात नडेलाची वैयक्तिक जडणघडण, त्याची नियुक्ती कशी करण्यात आली, मायक्रोसॉफ्टची आधीची स्थिती, नडेलाने ठामपणे केलेले बदल, त्याचे परिणाम आणि नडेलापुढची आव्हानं इत्यादी गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला हे पुस्तक म्हणजे सत्य नडेला या व्यक्तिमत्त्वाचं चरित्र आहे, तसंच दुसरीकडे, ते तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल, त्यामुळे होत असलेली स्पर्धा यांची मर्मदृष्टी देणारा माहितीपटही आहे.
सर्वसामान्य वापरकर्त्यांना या क्षेत्राची रंजक माहिती देणारं, आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना भान, प्रेरणा देणारं आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रोफेशनल्सना अंतर्दृष्टी देणारं पुस्तक…
सत्य नडेला : मायक्रोसॉफ्टचा बदलता चेहरा!
Reviews
There are no reviews yet.