या जगाला शिकवण्यासारखे माझ्याकडे नवीन काहीच नाही.
सत्य आणि अहिंसा या तर डोंगराइतक्या जुन्या गोष्टी आहेत.
– महात्मा गांधी
या पुस्तकात दर्शविलेल्या प्रयोगांना दृष्टांतरूप समजून, सर्वांनी
आपापले प्रयोग यथाशक्ती आणि यथामती करावेत, एवढीच माझी
इच्छा आहे. या मर्यादित क्षेत्रामध्येही लोकांना माझ्या आत्मकथेचा
उपयोग होऊ शकेल, असा मला विश्वास वाटतो. कारण, की
सांगण्यालायक एकही गोष्ट मी छपविणार नाही. माझ्या दोषांची
जाणीव वाचकांस परिपूर्ण करून देण्याची मला उमेद आहे. मला
फक्त सत्याचे शास्त्रीय प्रयोग वर्णायचे आहेत. मी कसा देखणा आहे
ते सांगत बसण्याची तिळमात्र इच्छा नाही. ज्या मापाने स्वत:ला
मोजण्याची इच्छा आहे आणि जे माप आपण सर्वांनी स्वत:ला
लावले पाहिजे, त्याप्रमाणे तर मी नि:शंकपणे म्हणेन की:
मौ सम कौन कुटिल खल कामी?
जिन तनू दियो ताहि बिसरायो
ऐसो निमकहरामी ।।
– महात्मा गांधी
Reviews
There are no reviews yet.