सआदत हसन मंटो-Saadat Hasan Manto

सआदत हसन मंटो-Saadat Hasan Manto

धर्मांध माणसांच्या विसंगतीपूर्ण वागण्याची मार्मिक नोंद

150.00

150.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

सआदत हसन मंटो (Saadat Hasan Manto)

सआदत हसन मंटो यांना दोनदा जीवन मिळालं-

एक मरणापूर्वी अन् दुसरं मरणानंतर.

दुसऱ्या जीवनात त्यांची प्रसिद्धी भारत आणि पाकिस्थानच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण जगात पसरून गेली. त्यांनी या दुनियेला आपल्या सिगारेटमध्ये भरून जाळलं आणि चष्म्याच्या भिंगांमागून बघणाऱ्या डोळ्यांना नेहमीसाठी बंद करून घेतलं.

त्यांच्या कथेतली पात्रं केवळ कपोलकल्पित नाहीत, तर ती या बहुढंगी दुनियेतली आणि समाजातली वास्तविक पात्रं असून ती आपल्या आजूबाजूला सतत जिवंत असल्याचा प्रत्यय आपणाला येतो.

लोकनाथ यशवंत यांना जाणण्यासाठी त्यांच्या कविता वाचणं आवश्यक आहे. त्यांच्या लिहिण्याची शैली सरळ आणि सोपी आहे. डोळ्यांसमोर घडणाऱ्या घटनांना ते मोठ्या शिताफीने असं काही कवितेचं रूप देतात की, वाचकाला तो आपलाच आवाज असल्याचा भास होतो.

वरवर शांत दिसणाऱ्या या कवीच्या आत एक ज्वालामुखी सतत खदखदत आहे; जो अन्याय अत्याचार, अमानवीयता, भ्रष्टाचार, धोका, भेदभाव कायमचा मिटवू इच्छितो. त्याचं आतल्या आत स्मित हे एका कवीचं यश आहे, ज्याला या कुरूप समाजाने नाकारण्याची अक्षम्य चुक केली आहे.

समाजाच्या कोड पडलेल्या काळ्या चेहऱ्यावर ते आपल्या लेखणीचा उपयोग कट्यारीसारखा इतक्या ताकदीने करतात, की सगळे अवाक् व हतबल होऊन जातात.

निदा फाजली, जयंत परमार, मन्सूर एजाज जोश, ओमप्रकाश बाल्मीकी, बाबुराव बागुल या महनीयांप्रमाणेच आता सआदत हसन मंटोही लोकनाथ यशवंतजींच्या मराठी अनुवादातून प्रगट होत आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सआदत हसन मंटो-Saadat Hasan Manto”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0