बाळाचा जन्म म्हणजे एक उत्सव! बाळाच्या वाळ्याचा रूमझुम
आनंद प्रत्येक पिढीला सर्जनशील संगोपनाचा शोध घेण्याची प्रेरणा
देत आला आहे. संगोपन म्हणजे पालक-पाल्य-पालक असा शतकांनुशतके वाहाणार्या नदीचा जणू प्रवाह आहे. प्रत्येक पिढीसोबत विस्तारणारा आनंदाचा ठेवा! याचा प्रत्ययकारी अनुभव म्हणजे हे पुस्तक.
गुंतागुंतीचा भवताल स्वत:मध्ये सामावून घेत आणि त्यातून निवड
करत बाळ मोठं होतं. बाळ आनंदी, आत्मनिर्भर, सर्जनशील आणि संवेदनक्षम होण्यासाठी मायेचे, निर्व्याज प्रेमाचे, सकारात्मक उर्जेचे
आणि सर्जनाचे धागे गुंफून संगोपनाचं दुपटं उबदार कसं करता येईल
याचं सूत्र या पुस्तकातून वाचकाला गवसेल.
संगोपन प्रक्रिया जेवढी आनंददायी तेवढीच आव्हानात्मक;
सर्जनात्मक तशीच संभ्रमात टाकणारी असते.
संगोपनातील जाणीवपूर्वक करता येणार्या गोष्टींची एक प्रक्रिया कोजागिरी, तिचे आई-बाबा या व्यक्तिरेखा आणि त्यांचा परिसर
यामधून उलगडत जाते. वाचक त्यात सहज गुंतत जातात.
वाढीच्या प्रत्येक वळणावरचं संगोपनातील मनोज्ञ अवकाश
पुस्तकातून उलगडत जातं.
Reviews
There are no reviews yet.