‘माणसांचं सारं जीवन संख्यांशी निगडीत असतं. रात्रंदिवस आपणा सर्वांना संख्यांशीच खेळावं लागतं. पण बहुतेकांना त्यांच्याशी जवळीक साधू नये, असं वाटतं. संख्यांनाही व्यक्तित्व असतं, हे अनेकांना माहीतही नसतं. आपल्या हाताशी असतात फक्त दहा अंक. त्यांच्यापासून निर्माण होणा-या संख्या असतात अनंत. त्यांचेच गुणधर्म असतात आश्र्चर्यकारक आणि असंख्य. बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार. या चारच क्रिया संख्यांना देतात अद्भुत आकार. संख्यांचे गहिरे रंग, हा आहे, संख्यांच्या गूढत्वाचा एक शोध. संख्यांच्या गहन सागरातील आश्र्चर्यांचा वेध. संख्यांच्या सागरात जो कुणी खोल खोल बुड्या मारील, त्याला संख्याच आपलंसं करतील, आणि आपल्या खजिन्यातील अमूल्य रत्नं दाखवतील. ‘
Reviews
There are no reviews yet.