‘श्रीशिवराय VP HRD ? आँ ?? पुस्तकाच्या नावात काही घोटाळा झालाय का ? अजिबात नाही ! शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापक होते, मुत्सद्दी राजकारणी होते, धुरंधर सेनानी होते, चारी दिशांना टपलेल्या शत्रूंना जरबेत ठेवणारे अन् रयतेचे अपत्यवत् पालन करणारे राज्यकर्ते होते. या साऱ्याबरोबरच हा जाणता राजा मानवी संसाधनांची प्रभावी योजना करणारा व्यवस्थापक होता. अष्टप्रधानांपासून शिलेदार-बारगिरांपर्यंत, सरदार-किल्लेदारांपासून चिटणीस-कारकुनांपर्यंत योग्य स्थानावर योग्य व्यक्तीची नेमणूक हे महाराजांच्या योजकत्वाच्या दूरदृष्टीचे वैशिष्ट्य. त्यांच्या या यशस्वी व्यवस्थापनाचा वर्तमानालाही मार्गदर्शक ठरणारा परिचय म्हणजेच श्रीशिवराय VP HRD ? ‘
Reviews
There are no reviews yet.