रणजित देसाई यांच्या असामान्य प्रतिभेचा अखेरचा आविष्कार म्हणजे ‘शे क रा’. काळी, झुपकेदार शेपूट असलेला आणि राखी रंगाचा हा खारीच्या जातीचा शेकरा, या झाडावरून त्या झाडावर झेप घेण्यासाठी प्रसिध्द आहे. घनदाट जंगलाच्या पार्श्र्वभूमीवर लिहिल्या गेलेल्या या कादंबरीचा हा नायक एकाकी आहे. आपल्या खाद्यासाठी सर्व जंगभर या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत हिंडता-फिरताना, सर्व ऋतूंमधली तिथल्या प्राण्यांची जिवंत राहण्यासाठी चाललेली धडपड आणि कधीकधी हतबल होऊन केलेला भीषण जीवनसंघर्षही तो बारकाईनं न्याहाळतो आहे. रणजित देसाई यांनी हे सारं चित्रण शेतकर्याच्या नजरेनं केलं असलं, तरी सगळी कादंबरी वाचून झाल्यावर वाचकाला शेतकर्यासारखे आपणही जीवनभर एकाकी प्रवास करतो आहोत, असं वाटल्याशिवाय राहत नाही. सुजाण वाचकाला अंतर्मुख करणारी ही साहित्यकृती आहे.
Ranjit Desai’s final masterpiece, “Shekara,” showcases his exceptional talent. The protagonist, a solitary Indian giant squirrel with a bushy black tail and ash-colored fur, is known for leaping between trees. Set against the backdrop of a dense forest, the novel vividly portrays the struggle for survival through changing seasons.
Though narrated from a farmer’s perspective, by the end, readers feel as if they, too, are on a lifelong solitary journey. This literary work deeply introspects life’s challenges, making it a thought-provoking and immersive read.
Reviews
There are no reviews yet.