शाळा ही काही समाजाबाहेर,
एखाद्या पोकळीत असणारी गोष्ट नाही.
ती समाजातून येते आणि पुन्हा समाजापर्यंतच वाहत जाते.
शाळा काही फक्त जीवनाची तयारी नव्हे;
ती समाजाच्या सामाजिक, आर्थिक वास्तवाचा
अविभाज्य भाग असते.
सध्या समाजात एकंदरीतच जे ताण आहेत
आणि दडपणं आहेत त्यांनाच शाळांनाही
तोंड द्यावं लागत आहे.
उदाहरणार्थ, स्पर्धा आणि व्यापारीकरणाच्या
वरवंट्याखाली भरडलं जाणं.
शाळा ज्या प्रकारे वाढलेल्या दिसतात,
तो काही योगायोग नाही; तो समाज, त्याची मूल्यं,
त्याच्या अपेक्षा आणि गरजा यांचा तर्कशुद्ध विस्तार
किंवा प्रतिबिंब आहे. आपल्या सध्याच्या समाजातली हिंसा,
भेदभाव आणि अन्याय यांनीच विविध प्रकारच्या
शाळांमधली उतरंडीची व्यवस्था निर्माण केली,
अभ्यासक्रमाचे तपशील ठरवले आणि शिक्षणाच्या पद्धती
आणि मूल्यमापनाच्या पद्धती ठरवल्या.
थोडं नकारात्मक अर्थानं आणि एका दृष्टिकोनातून पाहिलं
पण त्या शाळा जीवनापासून अलिप्त नाहीत तर अन्याय
आणि असमानता या कठोर वास्तवांचा भाग आहेत.
Reviews
There are no reviews yet.