शहीद भगतसिंग हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक धगधगती ज्योत आहेत. ते
केवळ क्रांतिकारकच नव्हे, तर निधर्मी-समाजवादी विचारांचे लेखक-पत्रकारही होते.
त्यांचे ग्रंथप्रेमही विलक्षण होते. यातून दिसते त्यांची अभ्यासूवृत्ती आणि विवेकवादी
दृष्टी.
जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर मातृभाषेचा व इतर भाषांचा
अभ्यास केला पाहिजे, हे त्यांचे विचार आज लागू पडणारे आहेत. त्यांचा
स्वातंत्र्यासाठीचा ध्येयवाद ज्वलंत होता. त्यांचे हे चरित्र आजही राष्ट्रप्रेम आणि
राष्ट्रभक्तीम्हणून सर्वांना प्रेरणा देणारे आहे.’
Reviews
There are no reviews yet.