आजार’ हा शब्द ऐकला तरी आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. एखादा आजार रोग जडला, की डॉक्टरांकडे चकरा सुरु होतात. मग त्यांनी लिहून दिलेली औषधे वाटेल ती किंमत मोजून घटली जातात. त्यातून आराम पडला नाही, तर मग पुन्हा दुसरा डॉक्टर, त्यांची औषधे असे चक्र सुरु होते. आपल्याला झालेल्या आजाराची थोडीफार तरी माहिती असणे आवश्यक आहे.
कारण वैद्यकशास्त्रातही आता पैसा दिसू लागला आहे. औषध उत्पादक आणि फार्मासिस्ट यांची साखळी तयार झाली आहे. यात अनेकदा कळत नकळत डॉक्टरांचा ही सहभाग असतो. यातून रुग्णाची फसवणूक होऊ शकते. ती टाळण्यासाठी रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी ‘वेताळाच्या आरोग्यकथा’ नावाचे उपयुक्त पुस्तक लिहिले आहे. फार्मसीचे शिक्षण घेतलेले असल्याने औषधामागील विज्ञान, राजकारण, फसवणूक, त्यावरील उपाय यांची खरी माहिती त्यांनी यात दिली आहे. विक्रम-वेताळाच्या संवादातून त्यांनी औषधाविषयीचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
Reviews
There are no reviews yet.