‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ ही अठरा अक्षरे म्हणजे राष्ट्रभक्तीची अठरा अध्यायांची गीताच ! अटलबिहारी वाजपेयींच्या शब्दांत : ‘सावरकर म्हणजे तेज ! सावरकर म्हणजे त्याग ! सावरकर म्हणजे तप ! सावरकर म्हणजे तत्त्व ! सावरकर म्हणजे तर्क ! सावरकर म्हणजे तळमळ ! सावरकर म्हणजे कविता अन् सावरकर म्हणजे क्रांती !’ सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक दुर्लक्षित पैलू विश्वासार्ह कागदपत्रांच्या साहाय्याने उजेडात आणणारा आणि सावरकरांवरील अनेक टीकांचे सज्जड प्रमाणांच्या आधारे निराकरण करणारा मौलिक दस्तऐवज. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगिंत असा कवण जन्मला
Reviews
There are no reviews yet.