विश्वामित्र सिण्ड्रोम (Vishwamitra Sindrom)

विश्वामित्र सिण्ड्रोम (Vishwamitra Sindrom)

पंकज भोसले हा पत्रकार असण्याबरोबर सिनेमा आणि साहित्याचा चाणाक्ष अभ्यासक आहे, एका अस्वस्थ काळाचा निरीक्षक आहे. आणि त्याचं हे टोकदार निरीक्षण ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या कथांना त्यांच्या साऱ्या विक्षिप्तपणासह जिवंत करतं.

Original price was: ₹350.00.Current price is: ₹280.00.

Original price was: ₹350.00.Current price is: ₹280.00.

Add to cart
Buy Now

विसाव्या शतकाच्या अखेरीला जागतिकीकरण नामक काहीतरी झालं आणि त्याचे पडसाद समाजाच्या सर्व थरात उमटले. जग लहान झालं. इंटरनेटच्या माध्यमातून हव्या नको त्या बऱ्याचशा गोष्टी थेट आपल्या दारात येऊन पोचल्या आणि त्यांनी आपल्या जगण्याचं तंत्रच बदलून टाकलं. ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या जोडकथा या अशा मोठ्या बदलाच्या साक्षीदार आहेत. वरवर पाहता त्या मुंबईनजीकच्या एका वस्तीत इंटरनेटवरून अवतरलेल्या पोर्नोग्राफीचा आणि त्यामुळे वरकरणी पापभीरू वाटणाऱ्या समाजातल्या विविध वृत्तीदर्शनाचा धांडोळा घेतात, पण प्रत्यक्षात तो त्यांचा केवळ एक पैलू आहे. तंत्रज्ञानापासून संगीतापर्यंत आणि राहणीमानापासून नातेसंबंधांपर्यंत आपला भवताल कसा बदलत गेला, याचं हे एकाच वेळी धक्कादायक तरीही गमतीदार असं दर्शन आहे.
पंकज भोसले हा पत्रकार असण्याबरोबर सिनेमा आणि साहित्याचा चाणाक्ष अभ्यासक आहे, एका अस्वस्थ काळाचा निरीक्षक आहे. आणि त्याचं हे टोकदार निरीक्षण ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या कथांना त्यांच्या साऱ्या विक्षिप्तपणासह जिवंत करतं.
गणेश मतकरी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विश्वामित्र सिण्ड्रोम (Vishwamitra Sindrom)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0