मोठमोठ्या वाड्यांबद्दल सर्वांना एक प्रकारचं आकर्षण वाटत असतं. त्याच्या गूढवलयाचं निराकरण हवं असतं अन् हा वाडा तर पेशवेकालीन…! काय काय घटना घडल्या असतील त्यावेळी वाड्यात…? तेथे वावरणारी कित्येक माणसं – त्यांचे हेवेदावे – सलोखा की सूडवैर – अन् त्यांचे आत्मे – अजून असतील का वावरत – तेथेच – त्यांना मुक्ती मिळेल…? स्थळ आणि त्या स्थळाशी संबंधित असलेली माणसं एकत्रित आल्यावर काय होतं, काय घडतं, याची प्रचीती त्यांना येत होती. त्यांची उपपत्ती तर्कावर आधारित होती. ती आतापर्यंत पुराव्यानं सिद्ध झाली नव्हती. त्यांच्या तर्काला कसलाही शास्त्रीय आधार नव्हता. पुराव्यानं सिद्ध करण्याची त्यांना संधीपण मी नव्हती. रावते यांच्या वाड्यानं ती अनपेक्षितपणे मी होती. पुन्हा अशी संधी मिळेल याची शाश्वती नव्हती. “आपण वाड्यामध्ये जातोय; पण तिथं काही विपरीत घडलं तर..?
Reviews
There are no reviews yet.