गप्पांमधून, संवादामधून संशोधकांची, त्यांनी लावलेल्या शोधांची आणि त्यांच्या आयुष्यातील गमतीजमतींची माहिती ‘शेअर’ करण्याचा क्लब म्हणजे ‘युरेका क्लब’!
या क्लबची भन्नाट आयडियाही शाल्मली, ईशा, अनिकेत, प्रणव आणि विराज अशा तुमच्यासारख्या मुलांचीच! या मुलांबरोबर या क्लबमध्ये आहे, एक ताई. तिने सायन्समधून एम.एस्सी. केलंय. मुलांच्या कलाने शिकवायची विलक्षण हातोटी तिच्याकडे आहे. मुलं तिच्याशी संशोधकांबद्दल बोलतात, प्रश्न विचारतात. कधी इंटरनेटचा वापर करून, तर कधी एनसायक्लोपीडिया वाचून शास्त्रज्ञांची माहिती गोळा करतात. इतकंच नाही, तर मोठ्या माणसांसारखी ‘प्रेझेंट’ही करतात! जिथे मुलं अडतात किंवा ताईला जास्तीची माहिती द्यावीशी वाटते तिथे ताई सहजसोप्या शब्दांत, न चिडता किंवा न ओरडता ती समजावून सांगते! आणि मग या संवादातून मिळत जाते युक्लिड, कोपर्निकस, आर्किर्मिडीज, न्यूटन, मेरी क्यूरी, आइनस्टाइन यांसारख्या २६ संशोधक आणि त्यांच्या शोधकार्याची माहिती!
ताई व मुलांच्या या ‘इनोव्हेटिव्ह’ गप्पांमधून तुम्हालाही उलगडत जातील अनेक संशोधनांमधली मर्मं आणि मग तुमच्याही तोंडून नकळत उद्गार बाहेर पडतील– ”युरेका… युरेका… युरेका क्लब!”
Reviews
There are no reviews yet.