‘मोगलाई’ ही कादंबरी वाचली, आवडली. ही कादंबरी लेखकाच्या आधीच्या कादंबरीलेखनाचे – ‘धरणसूक्त’चे पुढचे पाऊल आहे. या कादंबरीचे वेगळेपण असे की, येथे धरणांच्या उभारणीबरोबरच मानवी संबंधांचे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे अधिक चांगले चित्रण केले आहे. शिवाय यात समाजातील विविध स्तरांचे चित्रण आले आहे. समाजकारणापासून राजकारणापर्यंतची विविध क्षेत्रेही या कादंबरीतून प्रकट झाली आहेत. त्यामुळे ही कादंबरी जीवनचित्रणाच्या दृष्टीने अधिक समृद्ध आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले मागास समजल्या जाणाऱ्या भागात सृजनाच्या सोहळ्यात गुंतलेल्या हातांनी अन् मनांच्या कसदार मशागतीनी नवी कार्यसंस्कृती उभारणाऱ्या अभियंत्याची गुंतवून ठेवणारी कहाणी…
Reviews
There are no reviews yet.