माणसानं विज्ञानाच्या जोरावर निसर्ग व रोगराई काबूत आणली. प्रगती झपाट्याने होऊ लागली.
पण माणूस सुखावला का ? समाधानाचा निःश्वास त्यानं टाकला का?
की प्रगतीच्या रेट्याखाली तो दडपला गेला ? दळणवळण सोयीस्कर झालं पण मनं जुळली का?
उत्पादन वाढलं पण मन:शांती वाढली का? साधनसंपत्ती दुणावली पण मानसिक संतुलन ढळलं का?
साथीचे रोग काबूत आले पण शरीर सुदृढ झालं का?
प्रगतीच्या आडोशानं उभं राहून काही नव्याच समस्या चोरपावलानं आपल्या जीवनात येत आहेत.
नवे शत्रू निर्माण होत आहेत. या नव्या शत्रूंमुळे माणसं पटापट मरत नाहीत. तर त्यांचं शरीर पोखरलं जातं.
प्रगतीशील माणसानं एक नवाच शत्रू निर्माण केलाय. आधुनिक युगात शत्रू आहे मानसिक ताण! स्ट्रेस!!
Reviews
There are no reviews yet.