आपल्या चातुर्यानं अनेक कूटप्रश्नांची तर्कसंगत उत्तरं देणाऱ्या
बिरबलाच्या गोष्टी कोणाला आवडत नाहीत! बुद्धिचातुर्य आणि
तर्कसंगती याने ओतप्रोत भरलेल्या, सजगतेचे अनेक धडे देणाऱ्या
बिरबलाच्या गोष्टी ऐकल्या नसतील किंवा वाचल्या नसतील असा
माणूस शोधूनही सापडणार नाही. प्रत्येक पिढीगणिक गोष्टीतला गोडवा
वाढवणाऱ्या बिरबलाच्या असामान्य बुद्धिमत्तेला जर आधुनिक
विज्ञानाचं बळ मिळालं असतं तर त्यानं ज्या काही विलक्षण करामती
केल्या असत्या, त्यांच्या या गोष्टी… खास मुलांसाठी लिहिल्या असल्या
तरी मोठ्यांनाही त्या भावतील अशा आहेत…
Reviews
There are no reviews yet.