आईच्या पोटात असल्यापासून ते साधारण चार-पाच वर्षांचे होईपर्यंत बाळाचे आरोग्य राखण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी, साबद्दलची मूलभूत शास्त्रीय माहिती ह्या छोटया पुस्तकात थोडक्यात, सोप्या भाषेत दिली आहे.
बाळाच्या आरोग्यासाठी आईचा आहार कसा असावा यापासून ते बाळाला कोणता खाऊ द्यावा, कोणत्या लसी का घ्याव्यात, योग्य मानसिक विकासासाठी अमुक करा-तमुक करा एवढेच न सांगता शक्य तेथे ‘असे का?’ ह्याची शास्त्रीय पायावर फोड करून सांगितली आहे. ताप, जुलाब आणि खोकला ह्या नेहमी आढळणाऱ्या लक्षणांबाबतची शास्त्रीय माहिती ह्या पुस्तकात वाचत असतानाच रोग व त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती, रोगावरची उपाययोजना यांबाबतची काही सर्वसाधारण तत्त्वेही वाचकाला कळतील. तसेच गोवर, कांजिण्या, गालगुंड, जंत, अॅनिमिया, कावीळ, अपघात, दमा, नेहमीचे कातडीचे आजार, तापामुळे येणाऱ्या फिट्स याबाबतची थोडक्यात, नेमकी, शास्त्रीय माहिती उपयोगी ठरेल. उपयुक्त माहिती कळावी व शास्त्रीय दृष्टिकोन रुजावा ह्या दुहेरी हेतूने हे पुस्तक लिहिले आहे. बाळाच्या आरोग्याबाबत जे निरनिराळे गैरसमज असतात; अनेकदा जे चुकीचे, अनावश्यक उपचार केले जातात; अनावश्यक औषधे दिली जातात त्याबद्दल जागोजागी दिलेला इशारा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. कारण डॉक्टरी व्यवसायातील गैर प्रथांबाबत विशेष चिकित्सक दृष्टिकोन असणाऱ्या डॉक्टरांनी ती लिहिली आहे.
Reviews
There are no reviews yet.