‘निघालोय मी सूर्य पकडायला पर्यावरण सावैभौमत्वाच्या वाटेवरला मी योगी? छे! मी तर वियोगी! मिळाले नाही मला मागितले ते सर्व पण पाहिलेली सर्व स्वप्नं साकारली आहेत माझी. म्हणूनच आज आयुष्याच्या मावळतीला निघालोय पकडायला नर्मदा किना-यावरचा सूर्योदय. मला ठाउक आहे, हे सामान्य माणसाचे शतक आहे. न्यायोचित माणसाला, अन्याय्य व्यवस्थेत जागा एकच : तुरूंग किंवा मृत्यू तुरूंगाबद्दल मला प्रेम आहे आणि मृत्यूचे मला भय नाही. या माझ्या लोकमातेचं लावण्य कुणी हिरावून घेऊ नये म्हणून माझं जीवन मी उधळत राहणार आहे जगत राहणार आहे मी… – बाबा आमटे
Reviews
There are no reviews yet.