आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपण खचून जातो …क्वचित प्रसंगी कोलमडून जातो ..रोजच्या आयुष्यातल्या आणि अकल्पितपणे उद्भवणाऱ्या अशा अनेक प्रसंगांना , समस्यांना उमेदीने आणि मनोबळाने कसं सामोरं जावं याचं शास्त्रीय मार्गदर्शन डॉ . विजया फडणीस पुस्तकात समर्पक उदाहरणांद्वारे करतात .
आशावाद कसा जोपार ? मानसिक ताण कसे हाताळावेत ? आपल्यातील सुप्त शक्ती कशी ओळखावी ?
आपल्या वागण्याचं विश्लेषण कसं करावं ?
वाढत्या वयामध्ये व्याधींमुळे किंवा एकटेपणाच्या भावनेमुळे येणाऱ्या नैराश्याच्या भावनेला कसं सामोरं जावं …
अशा व इतर अनेक समस्यांवर त्या आपला अभ्यास, अनुभव व संवादी समुपदेशनाच्या कौशल्यातून वाट दाखवतात. सकारात्मकतेचं खत – पाणी देऊन आयुष्याला आनंदाचं झाड बनवणारं पुस्तक…
बहर मनाचा !
Reviews
There are no reviews yet.