हैद्राबाद मुक्तिसंग्राम हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान. या मुक्तिलढ्यातील ‘गोवर्धन सराळा’च्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा तरुण – शिवाजीराव गऊळकर. अदम्य धाडस, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण हे शिवाजीरावांचे स्वभावपैलू स्वातंत्र्यसैनिक म्हणून झळाळून उठले. साहित्यिक वृत्तीच्या गऊळकरांनी आपल्या आठवणींमधून केवळ स्वत:चे आयुष्य मांडले नाही; तर तो काळ, त्या काळातील विलक्षण माणसे अक्षरश: जिवंत केली आहेत. ‘सत्ता’ या घटकाकडे आवर्जून पाठ फिरवलेल्या पिढीतील एका बहुआयामी पण काहीशा दुर्लक्षित व्यक्तिमत्त्वाची प्रेरक कहाणी.
Reviews
There are no reviews yet.