फैज अहमद फैज. एक सुप्रसिद्ध उर्दू शायर. मूळचे लाहोरचे. फाळणीनंतर त्यांनी भारतात राहावं म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनीसुद्धा प्रयत्न केला, पण ते तिकडेच गेले. आणि अपेक्षाभंगाचं दु:ख आपल्या गझलांमधून व्यक्त करीत राहिले. तसे फैज होते मार्क्सवादी, डाव्या विचारसरणीचे. रशियाचे समर्थक. ‘लेनिन’ पारितोषिकाचे पहिले मानकरी. आणि तरीही ‘पाकिस्तानी’ साहित्यविश्वात रमणारे. त्यांचं हे चरित्र. फैज यांच्या गाजलेल्या गजला, त्यांची पत्रकारिता, त्यांची तुरुंगवारी, त्यांची प्रेमप्रकरणं, त्यांच्या आयुष्यातले असंख्य चढउतार… आणि त्या सर्वांपेक्षाही वरचढ ठरलेली त्यांची अर्धीमुर्धी स्वप्नं… जगावेगळं तेजोवलय लाभलेल्या एका कवीचं रसीलं चरित्र. फैज अहमद फैज
Reviews
There are no reviews yet.