फिन्द्री : मुलीच्या नकुशिपणाची गोष्ट (Findri : Mulicya Nakushipaṇachi Goṣhṭa)

फिन्द्री : मुलीच्या नकुशिपणाची गोष्ट (Findri : Mulicya Nakushipaṇachi Goṣhṭa)

स्त्री दुःखशोषणाची जाण आणि अस्मिताभान याचा खोलवरचा प्रत्यय देणारी ही कादंबरी महत्त्वाची ठरते.

Original price was: ₹380.00.Current price is: ₹339.00.

Original price was: ₹380.00.Current price is: ₹339.00.

Add to cart
Buy Now

Book Author (s):

डॉ. सुनिता बोर्डे / Dr. Suneeta Borde

पणजी, आजी, आई आणि मुलगी अशा हरएक पिढीतील स्त्रीच्या वाट्याला
आलेल्या ‘फिन्द्रीपणा’च्या (नकुशीपण) वाटा उलगडून दाखवणारी ही कादंबरी.
आई आणि मुलीचा जीवनसंघर्ष असणाऱ्या या कादंबरीतील समाजचित्रणास जात व
पुरुषसत्तासंबंधाचे बहुल असे संदर्भ आहेत.
बाईचा जन्म म्हणजे ‘इघीन’ आणि ‘काटेरी बाभूळबन’ असणाऱ्या
समाजातील बाईपणाच्या दुःखशोषणाचा कहाणीप्रदेश या कादंबरीतून साकारला आहे.
जात, धर्म, पितृसत्ता, लिंगभावाच्या दमनाबरोबर आधुनिक स्त्रीच्या संघर्षकर्तृत्वाची सुफळ कहाणी
या कादंबरीतून साकार झाली आहे. पराकोटीचा अभाव, दुःखशोषण,
सहनशीलतेबरोबर आत्मसन्मान आणि श्रेयसाची वाट वर्धमान करणाऱ्या आधुनिक स्त्रीची ही व्यथाकहाणी.
आर्थिक परावलंबन आणि जात-पुरुषदमण पार्श्वभूमीवर ‘शिक्षणशहाणपण’ हा स्त्रियांच्या
दुःखमुक्तीचा अवकाश आहे याचे विवेकी भान देणारी ही कथनदृष्टी आहे.
कादंबरीतील दलित समाजजीवनशैलीच्या तपशीलभरणाने समूहचित्रणाची कक्षा विस्तारली आहे.
तसेच आंबेडकरी व स्त्रीवादी विचारव्यूहांच्या दृष्टीने समाजसत्तासंबंध न्याहाळण्याची दृष्टी
कादंबरीतून व्यक्त झाली आहे. सुनीता बोर्डे यांची कथनशैली ही गोष्टीवेल्हाळ आहे.
आत्मपरता आणि समूहरीतीच्या वास्तव-कल्पनाविष्काराची बेमालूम सरमिसळण या कथनरुपात आहे.
या रूपबंधास स्थळ, प्रदेश, व्यक्ती तसेच घटनाप्रसंगांच्या मनोहरी गुंफणीतून
ललितशैलीची अनोखी परिमाणे लाभली आहेत.
स्त्री दुःखशोषणाची जाण आणि अस्मिताभान याचा खोलवरचा प्रत्यय देणारी ही कादंबरी महत्त्वाची ठरते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फिन्द्री : मुलीच्या नकुशिपणाची गोष्ट (Findri : Mulicya Nakushipaṇachi Goṣhṭa)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0