पर्यावरण क्षेत्रातील प्रज्ञावंत शोधव्रती.. ज्यांनी मानवी कल्याणाच्या ध्यासातून निसर्ग संवर्धनाचे कष्टमय कार्य केले, त्यासाठी अविरत झटल्या. या महिला संशोधकांनी आपल्या कार्याद्वारे जगाच्या नकाशावर आपला ठसा उमटवला; पण हे करताना त्यांना प्रत्यक्ष काय संघर्ष करावा लागला…? त्यांच्या आयुष्यात यामुळे कोणती वादळे उठली…? याची उत्तरे या पुस्तकात सापडतील.
एकीकडे वैयक्तिक सुख आणि दुसरीकडे वसुंधरेच्या रक्षणासाठी चळवळ.. दोन्हीत स्पष्ट रेघ मारत त्यांनी आपल्या कार्याला दिलेले प्राधान्य, पृथ्वीतलाच्या समृद्ध अस्तित्वासाठीची त्यांची धडपड आणि खडतर वाटचालीदरम्यान दोलायमान मनोपटलावरही ठाम राहून त्यांनी सिद्धीस नेलेले कार्य!
पर्यावरण रक्षणासारख्या काहीशा दुर्लक्षित परंतु अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये कार्य करताना ज्या प्रज्ञावंत स्त्रियांनी अवघे आयुष्य वेचले त्यांचे हे चरित्रबंध! सुप्रसिद्ध विज्ञानलेखक निरंजन घाटे यांच्या खास शैलीतील ही मांडणी वाचकांना अर्थगर्भ आणि सकस वाचनाची अनुभूती देईल.
Reviews
There are no reviews yet.