पर्यटन एक संजीवनी (Paryatan Ek Sanjeevani)

पर्यटन एक संजीवनी (Paryatan Ek Sanjeevani)

पुस्तकातील ‘गुगल’ किंवा ‘हार्वर्ड स्कूल’सारख्या व्यावसायिक स्थळांच्या भेटीतील अनुभव, चीन किंवा दक्षिण आफ्रिकेच्या सहलीमधल्या अनुभवांची वर्णनं त्या त्या देशातील आर्थिक व सामाजिक पैलूंवरही प्रकाश टाकतात. याचबरोबर काला पत्थर, अन्नपूर्णा बेसकँप, योसेमिटी इ. ट्रेकमधले थरारक अनुभव अंगावर अक्षरश: काटा उभा करतात. या अनुभवांबरोबरच लेखिकेने एक डॉक्टर म्हणून पर्यटनासाठी लागणाऱ्या फिटनेसबाबतही पुस्तकात चर्चा केली आहे.
पर्यटनातील अनुभव आपलं आयुष्य अनेक प्रकारे समृध्द करतात. नवनवीन भटकंती रोजच्या आयुष्यातला तोचतोचपणा नाहीसा करून नवा जोम, नवा उत्साह निर्माण करते. थोडक्यात काय तर, पर्यटन म्हणजे आयुष्यातला तेजस्वी सूर्यप्रकाश, चेतना देणारी संजीवनी… अर्थात् पर्यटन एक संजीवनी!

Original price was: ₹200.00.Current price is: ₹175.00.

Placeholder

Original price was: ₹200.00.Current price is: ₹175.00.

Add to cart
Buy Now

वैद्यकीय व्यवसाय करत असतानाच डॉ. लिली जोशी यांनी विलक्षण आंतरिक ओढीने प्रवासाचा छंद अनेक वर्षं जपला आहे. मात्र हा प्रवास म्हणजे ठरावीक पध्दतीने, ठरावीक ठिकाणीच केलेला प्रवास नव्हे. थोडी ‘हटके’ ठिकाणं पाहण्याकडे त्यांचा कल असतो. उदाहरणच द्यायचं झाल्यास गाडीने केलेली स्कॉटलंडमधली भटकंती, रेडवूडच्या जंगलातली सफारी, महाकाय व्हिक्टोरिया फॉल्सला दिलेली भेट… आणि ग्रीस व इजिप्तसारख्या लोकप्रिय तरीही वैशिष्टयपूर्ण ठिकाणी केलेलं पर्यटन… पुस्तकात असलेली अशी विविधता वाचकाला वेगळी अनुभूती देत खिळवून ठेवते.
मात्र हे पुस्तक म्हणजे केवळ प्रवासवर्णन नक्कीच नाही. पुस्तकातील ‘गुगल’ किंवा ‘हार्वर्ड स्कूल’सारख्या व्यावसायिक स्थळांच्या भेटीतील अनुभव, चीन किंवा दक्षिण आफ्रिकेच्या सहलीमधल्या अनुभवांची वर्णनं त्या त्या देशातील आर्थिक व सामाजिक पैलूंवरही प्रकाश टाकतात. याचबरोबर काला पत्थर, अन्नपूर्णा बेसकँप, योसेमिटी इ. ट्रेकमधले थरारक अनुभव अंगावर अक्षरश: काटा उभा करतात. या अनुभवांबरोबरच लेखिकेने एक डॉक्टर म्हणून पर्यटनासाठी लागणाऱ्या फिटनेसबाबतही पुस्तकात चर्चा केली आहे.
पर्यटनातील अनुभव आपलं आयुष्य अनेक प्रकारे समृध्द करतात. नवनवीन भटकंती रोजच्या आयुष्यातला तोचतोचपणा नाहीसा करून नवा जोम, नवा उत्साह निर्माण करते. थोडक्यात काय तर, पर्यटन म्हणजे आयुष्यातला तेजस्वी सूर्यप्रकाश, चेतना देणारी संजीवनी… अर्थात् पर्यटन एक संजीवनी!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पर्यटन एक संजीवनी (Paryatan Ek Sanjeevani)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0