‘गेलेल्या माणसाबद्दल आठवणींचे पूर कधी आणि कसे येत राहतील सांगता येत नाही. एखादं नातं अवघड वळणावर असताना जर तो माणूस गेला; तर चांगल्या आठवणी पार मनाच्या तळाशी जाऊन बसतात, वाईट आठवणी वारंवार त्रास देतात. पण जसजसे दिवस आणि वर्षं जातात, तसतसं त्या नात्याकडे अलिप्तपणे बघायला जमतं. नात्यातले खरे जगलेले, कसोटीचे, अडचणीचे आणि अतीव आनंदाचे क्षण एकत्र जगलो होतो आपण, हे जाणवतं. त्या त्या वेळच्या आपल्या प्रतिक्रियांचाही नव्याने अन्वयार्थ सापडतो. आपण जगलेल्या सहजीवनाबद्दलचं हे चिंतन म्हणजे जीवनाच्या सगळ्या कडूगोड अनुभवांकडे निर्मळ मनाने पाहत घेतलेला स्वत:चा शोध! ‘
Reviews
There are no reviews yet.