नरेंद्र दामोदरदास मोदी. सलग २० वर्षे सत्तेत असणारा लोकप्रिय नेता, टोकाची प्रशंसा व तीव्र टीकेचा धनी! ‘ग्रेट डिव्हायडर’ अशी एकीकडे ओळख असणार्या या नेत्याने दुसरीकडे आधी भाजपाची कार्यसंस्कृती बदलली आणि प्रशासनाचीही! यशस्वी लसीकरण करून कोरोना महासंकटातही ‘काम करणारी लोकशाही’ अशी भारताची नवी ओळख जगाला करून दिली, सरकारी योजना गरिबांच्या घरात थेट पोहोचवून आळशी लोकशाही कार्यान्वित केली, कणखर परराष्ट्रधोरणातून शत्रुराष्ट्रात धाक निर्माण केला, धाडसी निर्णय घेत अर्थव्यवस्था ‘फॉर्मल’ केली आणि भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला अग्रस्थान देत ‘सार्वभौम, हिंदू प्रजासत्ताका’च्या दिशेने वाटचाल सुरू केली… पक्षात आणि भारतात नवी कार्यसंस्कृती रुजवणार्या संघटनानिष्ठ नेत्याच्या गुणावगुणांचे राजकीय चरित्र…
Reviews
There are no reviews yet.