दोस्त यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखे विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबध्द जीवनाविरुध्द कंटाळून बंड करणारी… अशी ही माणसे आहेत. या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रुपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामर्थ्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो. कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.
“”Dost” portrays diverse characters—proud, stubborn, struggling, or rebelling against monotony—mirroring real-life people. Their joys, sorrows, and dreams feel relatable. V. P. Kale masterfully transforms simple ideas into emotional stories, blending philosophy with everyday dialogues. His positive outlook inspires, with the title story reaching the pinnacle of these themes.
Reviews
There are no reviews yet.