मोठ्या शहरांत डॉक्टरकी करून पैसे कमवायची एखाद्या डॉक्टरची इच्छा असेल, तर त्यात वेगळे काही नाही; पण एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरला पैशांपेक्षाही ग्रामीण भागात राहून रुग्णसेवा करणे महत्वाचे वाटत असेल, तर ती नक्कीच आश्चर्याची आणि त्याहीपेक्षा आदराची गोष्ट ठरते. डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर अशा मोजक्या डॉक्टरांपैकीच एक आहेत.
डॉ. टोणगावकर हे स्वतः ग्रामीण भागातून आले असून, वैद्यकीय अभ्यासात उत्तुंग यश मिळवूनही ते ग्रामीण जनतेच्या सेवेसाठी खेड्यांकडे वळले. धुळे जिल्ह्यातील आदिवासी भागाजवळील दोंडाईचा या गावी त्यांनी वैद्यकीय सेवा सुरु केली. अनेक अडथळे पार करीत तेथे शस्त्रक्रिया केल्या. तेथील डॉक्टरांनाही मार्गदर्शन केले. ‘दया, सेवा, शुश्रुषा,’ ही त्यांची त्रिसूत्री राहिली. या साऱ्या प्रवासाचीच ही कहाणी आहे.
Reviews
There are no reviews yet.