दलित स्त्री आत्मचरित्रांची वाङ्मयीन परंपरा मराठीत इतर भारतीय भाषांच्या तुलनेत मोठी आहे. मूळ महाराष्ट्रातील नागपूरच्या असलेल्या कौसल्या बैसंत्री या लग्नानंतर महाराष्ट्राबाहेर गेल्या व त्यांचा दिल्लीतील दीर्घ वास्तव्यामुळे मराठीशी संपर्क तुटला. त्यामुळे त्यांनी हे आत्मचरित्र हिंदीत लिहिलं असलं, तरी ते एका महाराष्ट्रीयन स्त्रीचंच आत्मचरित्र आहे. आदिवासी भागातल्या आजोळच्या आठवणींपासून ही जीवनकथा सुरू होते. चळवळींमधला प्रत्यक्ष सहभाग, शिक्षणासाठीची धडपड, राजकीय नेत्याशी केलेला विवाह असे अनेक तन्हांचे समृद्ध अनुभव अत्यंत प्रामाणिकपणे या आत्मचरित्रात मांडलेले दिसतात. दलित असणं आणि स्त्री असणं अशा दुहेरी शापातून एक व्यक्ती आपला जीवनसंघर्ष किती खंबीरपणे करते, त्याचं चित्रण या आत्मचरित्रात केलेलं आहे.
Reviews
There are no reviews yet.