जीवसृष्टीचा सगळा इतिहास निर्जीव जीवाश्म अर्था फॉसिल्समधून रेखला जातो. त्या दृष्टिकोनातून हिंडता-फिरताना भेटलेल्या दगड-धोंड्यांची
भूशास्त्रीय अंगाने केलेली रचना म्हणजे हे पुस्तक होय. यात तीन जिल्हे जराशा तपशिलात भेटतील, पण त्याबाहेरही भरपूर हिंडणं-फिरणं होईल. काळाच्या मापात मात्र क्रेटॉन्स घडवणार्या प्राचीन खडकांपासून ताजे बेसाल्ट थर आणि त्यांच्यातले इंटर-ट्रॅपीयन्स भेटतील.
अशा भेटीतून बरेच प्रश्न पडतील आणि त्यांची अर्थवट उत्तरं मिळतील. एका काळात झाडांचा कोळसा का झाला आणि वेगळ्या काळात झाडं अश्मीभूत का झाली? वनस्पती आणि प्राणी यांचे जीवाश्म फारदा एकत्र का सापडत नाहीत?
बराचसा महाराष्ट्र व्यापणार्या बेसाल्टखाली काय असेल? विचार करा. हिंडा. फिरा. दगड-धोंड्याशी गप्पा मारा. त्यासाठी पूरक वातावरणाची निर्मिती करणारं, नेमकी दिशा दाखवणारं
हे पुस्तक मात्र हाताशी असू द्या.
Reviews
There are no reviews yet.