बांधकाम उद्योगात अपार मंदी आहे. माझ्या अनेक गिर्हाईकांकडे पैसे नाहीतम्हणून माझ्याहीकडे पैसे नाहीत. ती गिर्हाईके माझी बिले भरपूर उशीर करून, अर्धवट, तुकड्याने देतात. मी माझ्या कंत्राटदाराचे, पुरवठादारांचे पैसे तसेच उशीराने, तुकड्याने, अर्धवट देतो. पण माझे ना गिर्हाईकांशी संबंध फार बिघडत, ना पुरवठादार कंत्राटदारांशी. हा भारतीय गुण असावा! की हा भारतीय दुर्गुण आहे? ‘अनबिझनेसलाईक’ प्रकार आहे? ‘लीन ऍण्ड मीन’ नसल्यामुळे जागतिकीकरणात मारक ठरणारी लढाई आहे?…
Reviews
There are no reviews yet.