९-१० ऑक्टोबर, १९६४
मी ते दृश्य लिहून पूर्ण करेस्तोवर जवळपास मध्यरात्रीची वेळ झालेली होती. गुरू दत्त यांनी माझ्यासोबत जेवायला बसायचं कबूल केलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यांनी काही देखील खाल्लेलं नव्हतं. मला भूक लागलेली असल्याने मी मात्र यथेच्छ जेवलो. ज्या अर्थी गुरू दत्त मद्याचा प्याला लीलया हाती धरून होते, त्या अर्थी ते पिऊन खूप बेहोश झाले होते, अशातली गोष्ट नव्हती. परंतु त्यांची मनोऽवस्था मात्र निश्चितच भयानक होती. मला त्यांना संहिता वाचून दाखवायची होती, पण ते जराही ऐकून घेण्याच्या मनोऽवस्थेत नव्हते. खरंतर त्यातून मला संकेत मिळायला हवा होता. (अबरार अल्वी)
__
गुरू दत्तने अबरारना संहिता रतनकडे ठेवून जाण्यास सांगितलं. ”इफ यू डोन्ट माईंड आय वुड लाइक टू रिटायर,” असं म्हणून गुरू दत्त उठून उभे राहिले आणि आपल्या खोलीत गेले… ते गुरू दत्तचे अखेरचे शब्द ठरणार होते.
त्या दहा वर्षांतील गुरू दत्त
– गुरू दत्तचे निकटतम सहकारी व जिवलग मित्र अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरू दत्तच्या व्यक्तिमत्त्वावर व त्याच्या अकाली मृत्यूसह त्याच्या जीवनातील विविध घटनांवर नव्याने प्रकाश
– अबरार-गुरू दत्त यांच्या १९५४-६४ दरम्यानच्या सहप्रवासातून साकार झालेल्या ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ व ‘साहिब बीबी और गुलाम’सह सर्व चित्रपटांच्या निर्मितीप्रक्रियेचा सूक्ष्म वेध
Reviews
There are no reviews yet.