तिच्या आरोग्यासाठी आजच्या जगण्यात सर्वच पातळ्यांवर संवाद नामशेष होताना दिसून येत आहे. वैद्यक व्यवसायही त्याला अपवाद नाही. या धावपळीच्या आयुष्यात अनेक डॉक्टर्स इच्छा असूनसुद्धा रुग्णांशी संवाद करू शकत नाहीत. दवाखान्यातील गर्दी पाहून रुग्णदेखील मनातील शंकाकुशंका प्रत्यक्ष डॉक्टरसमोर व्यक्त करण्यास संकोच करतात. मग स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र नावाचा महासागर आणि सामान्य माणूस यांमधील एखादा सुबोध दुवा समाजासाठी गरजेचा ठरतो.
‘तिच्या आरोग्यासाठी सर्व काही’ हे पुस्तक याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. वयात येणारी मुलगी, विवाहिता, गर्भवती ते रजोनिवृत्तीनंतर वृद्धापकाळाकडे झुकणारी स्त्री-अशा स्त्रीच्या आयुष्याच्या सर्व महत्त्वपूर्ण टप्प्यांवरच्या आरोग्य-प्रश्नांची माहिती, हे पुस्तक देते. याचबरोबर निगेटिव्ह रक्तगट, जुली बाळे, उच्च रक्तदाब अशा अवघड गर्भावस्थासंबंधी उपयुक्त माहिती इथे दिली आहे. पुरूष नसबंदीचे नगण्य प्रमाण, स्त्रीच्या आरोग्याबाबत पुरुषाची जबाबदारी, स्त्रियांचे उपवास आणि त्यांचा आरोग्याशी असणारा संबंध, व्यायाम आणि आरोग्य, स्थूलतेचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम- अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर डॉ. किशोर अतनूरकर यांनी प्रस्तुत पुस्तकात आस्थेने लिहिले आहे. स्त्रियांच्या मनात असणाऱ्या आरोग्याविषयक अनेक शंकांची उत्तरे या पुस्तकात नक्की सापडतील.
Reviews
There are no reviews yet.