निरभ्र आकाशात सूर्यास्तानंतर आकाशाच्या काळ्याभोर पडद्यावर एकामागून एक तारा उमटू लागतो. हे तारे येतात कुठून? कसा होतो तार्यांचा जन्म? ते का लुकलुकतात? त्यांच्या तेजाचे रहस्य काय? तारे नष्ट होतात का? आपला सूर्यही एक तारा – मग तोही नष्ट होईल का? ‘तारा तुटतो’ म्हणजे नेमके काय घडते? दुसर्या एखाद्या तारामंडळात आपल्यासारखे सजीव असतील का? प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी उमटलेल्या या प्रश्नांची शास्त्रीय अन् तर्कशुद्ध उत्तरे मिळतील या पुस्तकातून ! जागतिक दर्जाचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उमटलेल्या मूळ हिंदी पुस्तकाचा डॉ. पुष्पा खरे यांनी केलेला सुबोध, रसाळ मराठी अनुवाद.
Reviews
There are no reviews yet.