उल्हास नदीच्या तीरावर ‘एनआरसी’ नावाची एक आटपाट कॉलनी होती. तिथे सगळं एकच होतं. एक कारखाना. एक शाळा. एक मैदान. एक स्टेशन. एक बँक. एक कॅंटीन. एक लाँड्री. एक सोसायटी. एक नदी. त्यातलंच एक घर. एक आई. एक बाबा. एक बहीण. एक आजी. एक आत्याबाई. एक आजोबा. एक काका. आणि एक मुलगी. तिथून सुरू झालेली तिच्या चौखूर धावेची ही कहाणी…
Reviews
There are no reviews yet.